स्वर्गिय महादेवराव नारायण महाडीक (शेठ) यांच्या विचारातुन साकार झालेली *कडेगावं तालुका (जि. सांगली ) सेवा संघ, मुंबई ही महाराष्ट्रतील्ल खेडय़ापाडय़ांतून मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीकरिता महत्वपुर्ण ठरावी अशी एकमेव संघटना आहे. "संघटनेतुन सामाजिक परिवर्तन" हे या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. मुंबई बाहेरुन आत्रेल्या व्यक्ती नोकरी, व्यवसाय, उद्योग, रोजगार करुन शहरात चांगल्या प्रकारे वास्तव्य करून रहिवासी बनल्रे आहेत. परंतु सर्व रहिवासी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोईनुसार रहात आहेत.
सर्व तालुक्यातील रहिवास्यांना चांगल्या विचारांच्या माळेत गुंफण्याचे काम स्व. महादेवराव महाडीक (शेठ) व त्यांच्या विचाराशी एकरूप असलेल्या रहिवाशांनी सिद्ध करुन दाखवल्रे आहे. हेच वटवृक्ष रुपी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री. उमेशराव महादेवराव महाडीक हे पुढे चालवत आहेत.
संघटना खालील समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे.
हे उपक्रम निरपेक्ष भावनेने संघटना करित आहे. आपण जर कडेगांव तालुक्यातील रहिवाशी असाल तर रु. १०१० /- (रुपये एक हजार दहा) भरून सभासद व्हावे व संघटनेचे फायदे घ्यावेत.
आता घरी बसुन जगभरातील मुला मुलींचे नाव या वेब साईट वर नोंदवु शकता व विवाह जुळवु शकता. नोंदणी फी वार्षिक रु. १०१०/- एवढी आहे.